कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त D. Y. Patil College of Engineering and Technology येथे “Women in Leadership: Driving Innovation and Meaningful Impact” या विषयावर विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या Women Development Cell तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत leadership, innovation आणि women empowerment याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात Indian National Trust for Art and Cultural Heritage च्या कन्व्हेनर Architect अमरजा राजाराम निंबाळकर, Tej Couriers च्या Managing Director साधना सुरेश घाटगे, Menon Pistons च्या Executive Director शरण्या सचिन मेनन, भरतनाट्यम नृत्यांगना कविता नायर तसेच Clinical Psychologist व समुपदेशक डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी आपल्या अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाला DY Patil Group च्या CHRO श्रीलेखा साटम, Certified Yoga Teacher पूनम गुप्ता, Internal Complaints Committee (ICC) च्या माजी प्रमुख डॉ. क्षमा कुलहल्ली तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रचना संपतकुमार यांची विशेष उपस्थिती होती.चर्चासत्रामध्ये women leadership, entrepreneurship, innovation आणि career opportunities या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी नेतृत्व करताना आलेली आव्हाने, संधी आणि यशस्वी प्रवास याबाबत वक्त्यांनी अनुभव शेअर केले. विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत संवाद साधला.
Architect अमरजा निंबाळकर यांनी heritage conservation आणि architecture field मध्ये महिलांची वाढती भूमिका अधोरेखित केली. साधना घाटगे यांनी उद्योगक्षेत्रातील अनुभव सांगत leadership, discipline आणि decision making चे महत्त्व स्पष्ट केले. शरण्या मेनन यांनी आधुनिक उद्योगव्यवस्थेत technology आणि innovative thinking स्वीकारण्याची गरज सांगितली.
भरतनाट्यम नृत्यांगना कविता नायर यांनी कला आणि संस्कृती क्षेत्रातून personality development आणि confidence वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. उर्मिला भोसले यांनी mental health, self-confidence आणि positive mindset याविषयी मार्गदर्शन केले. श्रीलेखा साटम यांनी योग्य मनुष्यबळ निवड, जबाबदारीचे वाटप आणि management skills याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाला अभियांत्रिकी व वास्तुकला विभागातील महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी ICC Presiding Officer एन. डी. जिरगे आणि Faculty Coordinator इंजि. गौरी म्हेतर यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष Dr. Sanjay D. Patil, उपाध्यक्ष Satej D. Patil, विश्वस्त Ruturaj Patil, Prithviraj Patil, कार्यकारी संचालक Dr. A. K. Gupta, प्राचार्य Dr. S. D. Chede तसेच रजिस्ट्रार Dr. L. V. Malde यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments