कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
D. Y. Patil Deemed University, Kolhapur चा १४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता D. Y. Patil Hospital Ground, Kadamwadi, Kolhapur येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती Dr. Sanjay D. Patil असतील.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जागतिक कीर्तीचे लाईफ कोच, प्रेरणादायी वक्ते आणि BAPS Swaminarayan Sanstha चे संत Dr. Gyanvatsal Swami उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू Dr. Rakesh Kumar Sharma यांनी दिली.
विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली असून शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नॅकचे ‘A++’ मानांकन, QS I-GAUGE Diamond दर्जा आणि NIRF रँकिंगमध्येही विद्यापीठाने उच्च स्थान मिळवले आहे.या दीक्षांत समारंभात एकूण ७४१ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यापैकी १७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर १४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. तन्वी संजय देसाई यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक Abhay Joshi यांनी दिली.

0 Comments