कोल्हापूर | प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पार पडलेल्या Direct Recruitment Process मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. मंदार सूर्यकांत मालंडकर यांची Groundwater Surveys and Development Agency (GSDA), पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये Junior Geologist (Group-B Gazetted Officer) या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
डॉ. मालंडकर यांनी M.Sc. व Ph.D. (Geology) पदवी संपादन केली असून Research Field मध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध National आणि International Journals मध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांनी चार पुस्तके प्रकाशित करून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.Groundwater Surveys and Development Agency (GSDA) ही राज्यातील महत्त्वाची तांत्रिक संस्था असून Groundwater Exploration, Development आणि Conservation हे तिचे प्रमुख कार्य आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, Minor Irrigation Projects, विंधन विहिरी (Tube Well Drilling), Artificial Recharge Projects तसेच भूजल पातळी निरीक्षण यांसारखे उपक्रम संस्था राबविते.
वाढती लोकसंख्या, Climate Change आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर Sustainable Groundwater Management ही काळाची गरज ठरली आहे. अशा वेळी डॉ. मंदार मालंडकर यांसारख्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती ही राज्यासाठी सकारात्मक व आशादायी पाऊल मानली जात आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कोल्हापूरसह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments