कोल्हापूर | प्रतिनिधी :
कसबा बावडा येथील Dr. D. Y. Patil Polytechnic च्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील Best Outgoing Students म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील अथर्व शशिकांत शिंदे आणि तन्वी जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली.Dr. D. Y. Patil Group चे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांतील Academic Performance, Sports, Social Activities तसेच मुलाखतीच्या आधारे ही निवड प्रक्रिया पार पडली.याचबरोबर सुतेज सुशांत शेटगे (सिव्हिल), साहिल संजय गोदे (मेकॅनिकल), पार्थ सागर जाधव आणि राही राहुल पाटील (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) तसेच आर्यन शिवाजी खोत (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग) यांना त्यांच्या विभागातील Best Outgoing Student म्हणून सन्मानित करण्यात आले.तसेच Best Hirakani म्हणून मृणाल सागर चौगले, Poly Prince हर्षवर्धन रणनवरे व पृथ्वीराज ढवण, तर Poly Princess म्हणून अर्पिता पाटील आणि पूर्वा तोडकर यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमास उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. अजय बंगडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज अलास्कर यांनी केले.
संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेत या विद्यार्थ्यांच्या यशामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
.jpg)
0 Comments