कोल्हापूर | प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोल्हापूर येथील ‘जादू ग्रुप’तर्फे Panchganga Smashanbhoomi येथे ‘शेणी दान’ उपक्रम उत्साहात पार पडला. स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी लागणाऱ्या इंधनाची गरज लक्षात घेऊन ग्रुपच्या वतीने मोलाचे योगदान देण्यात आले.
या उपक्रमात ‘जादू ग्रुप’चे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. सामाजिक कार्याची आवड आणि निस्वार्थ सेवेची भावना जोपासत सर्वांनी श्रमदान व दान उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडांसोबत शेणींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही गरज ओळखून ‘जादू ग्रुप’ने पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. यावेळी सदस्यांनी सांगितले की, “समाजाप्रती आपले काही देणे लागते, या भावनेतून आम्ही वेळोवेळी असे उपक्रम राबवत असतो. बाल सदस्यांच्या सहभागामुळे त्यांच्यातही सामाजिक जाणीव आणि सेवा भाव वाढीस लागेल.”
या उपक्रमाचे पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील नागरिक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहे. ‘जादू ग्रुप’च्या या पुढाकारामुळे सामाजिक कार्याचा एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.
Panchganga Smashanbhoomi Kolhapur, Jadu Group Kolhapur, Shenni Daan Upakram, Kolhapur Social Activity, Environmental Awareness Kolhapur, Smashanbhoomi Donation News

0 Comments