BJP Yuva Morcha State President Krishnaraj Mahadik यांचे १ मार्च रोजी कोल्हापुरात Grand Welcome Rally

कोल्हापूर | नवप्रवाह मराठी चॅनेल

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या Krishnaraj Mahadik यांचे रविवारी (१ मार्च) कोल्हापुरात आगमन होत असून, त्यांच्या स्वागतासाठी भव्य Bike Rally काढण्यात येणार आहे. सुमारे २ हजार दुचाकी स्वारांच्या सहभागातून होणारी ही Grand Welcome Rally करवीर नगरीत उत्साहात पार पडणार असल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली.भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत स्वागत सोहळ्याचा आराखडा निश्चित करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी रॅलीची सविस्तर माहिती दिली.

गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि Youth Icon म्हणून ओळख निर्माण केलेले कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वी Formula 3 International Car Racing मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देश-विदेशात नाव कमावले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य सन्मान देण्याची भूमिका व्यक्त केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांची भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांसह प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली आहे. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 स्वागत रॅलीचे नियोजन

रविवार, १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून रॅलीला प्रारंभ होईल. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही Bike Rally मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक भाजपा कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी कृष्णराज महाडिक समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे जल्लोषी स्वागत व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता.

यावेळी राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments