डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकची Badminton Championship मध्ये विजेतेपदाची Hat-trick

कोल्हापूर | नवप्रवाह मराठी 

कसबा बावडा येथील Dr. D. Y. Patil Polytechnic च्या मुलांच्या संघाने Inter Engineering Diploma Students Sports Association अंतर्गत आयोजित विभागीय Badminton Championship मध्ये सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत हॅट्ट्रिक साधली आहे. सावंतवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 11 संघ सहभागी झाले होते.विजयी संघात अथर्व शिंदे, हेत छाभैय्या, तनिष्क यादव, मितेश पटेल आणि मेहुल पटेल यांचा समावेश आहे. उत्कृष्ट Team Coordination, Match Strategy आणि दमदार खेळाच्या जोरावर डी. वाय. पाटील संघाने शरद पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक रत्नागिरी तसेच अंतिम सामन्यात संजय घोडावत पॉलीटेक्निकवर निर्णायक विजय मिळवला.

विभागीय Badminton Championship मधील विजेत्या Dr. D. Y. Patil Polytechnic संघाचा सत्कार करताना अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व मान्यवर.
या यशस्वी कामगिरीनंतर विजेता डी. वाय. पाटील संघ संजीवनी केबीपी पॉलीटेक्निक, कोपरगाव येथे होणाऱ्या State Level Badminton Tournament मध्ये सहभाग घेणार आहे.

विजेत्या खेळाडूंचा सत्कार डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, जिमखाना विभागप्रमुख अक्षय करपे आणि प्रा. सुरज जाधव उपस्थित होते.

संस्थेच्या या उल्लेखनीय यशामुळे क्रीडा क्षेत्रात डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Post a Comment

0 Comments