कोल्हापूर | नवप्रवाह मराठी
परंपरागत स्थानिक साहित्य आणि लोकांच्या सक्रिय सहभागातूनच खऱ्या अर्थाने Sensitive and Sustainable Architecture घडते, असे प्रतिपादन प्रख्यात वास्तुविशारद Santosh Ramane यांनी केले. कसबा बावडा येथील D. Y. Patil School of Architecture येथे “Architecture and Sustainability” या विषयावर आयोजित Seminar मध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.हा उपक्रम D. Y. Patil College of Architecture, Talsande आणि D. Y. Patil School of Architecture, Navi Mumbai यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना रामाणे यांनी स्पष्ट केले की, वास्तुरचना ही केवळ Building Construction Process नसून ती सामाजिक (Social), सांस्कृतिक (Cultural) आणि पर्यावरणीय (Environmental) जाणिवांशी जोडलेली असते. स्थानिक माती, दगड, लाकूड यांसारख्या Local Materials चा अभ्यासपूर्वक वापर केल्यास बांधकाम अधिक Eco-Friendly, Cost-Effective आणि Long-Lasting ठरते.लोकसहभागातून उभारलेली वास्तू ही त्या परिसराच्या ओळखीचे प्रतीक बनते. पारंपरिक तंत्रज्ञान (Traditional Techniques) आणि आधुनिक गरजा (Modern Needs) यांचा योग्य समतोल साधणे हीच खरी Sustainability असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्थानिक कारागिरांचे कौशल्य जपणे आणि त्यांना प्रक्रियेत सहभागी करणे हीच खरी Community-Based Development Model असल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांनादिला.परिसंवादादरम्यान त्यांनी विविध Architectural Projects च्या उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी Program Coordinators प्रा. नीला जिरगे, प्रा. कृष्णाली पाटील, निराली गिलबिले, देविका घाटगे, तनया वणकुद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच आर्किटेक्चर विभाग प्रमुख आय. एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments