३ वर्षे फरार असलेला ‘ट्रेड विंग सोल्युशन’चा संचालक अखेर जेरबंद | Trade Wing Solution Director Arrested After 3 Years on the Run

कोल्हापूर: प्रतिनिधी 

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ए एस ट्रेडर्सची उपकंपनी ‘ट्रेड विंग सोल्युशन लिमिटेड’च्या फरार संचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.पलूस येथे स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई.trade-wing-solution-fraud-case-director-arrested-after-3-years

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए एस ट्रेडर्सची उपकंपनी ‘ट्रेड विंग सोल्युशन लिमिटेड’च्या फरार संचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष नंदकुमार कुंभार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

३ वर्षे २ महिने २७ दिवस पोलिसांना चकवा

तब्बल ३ वर्षे, २ महिने आणि २७ दिवस पोलिसांना चकवा देत फरार राहिलेल्या कुंभाराला मंगळवारी सांगली जिल्ह्यातील पलूस येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील तपासाला मोठी गती मिळाली आहे.

यापूर्वी २० आरोपींना अटक

या प्रकरणात यापूर्वीच २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, तीन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मात्र अद्याप सोळा आरोपी फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यापैकी संतोष कुंभार याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही मोहिम राबवली. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments