रमाबाई आंबेडकरांच्या पोत्यात 68 कोटी रुपयांच्या सोन्याची साडी प्रदान करणारे डॉ. रोहित पिसाळ शाहू महाराजांच्या भेटीला; शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक भेट

कोल्हापूर : प्रतिनिधी

रमाबाई आंबेडकर यांच्या लंडन येथील पुतळ्यास ६८ कोटी रुपये किमतीची सोन्याची साडी प्रदान करणारे डॉ. रोहित पिसाळ यांनी Dr Rohit Pisal शिवजयंतीनिमित्त आज कोल्हापुरात ऐतिहासिक भेट दिली. अंडर वॉटर गोल्ड मायनिंगच्या एकमेव भारतीय प्रकल्पाचे अध्यक्ष असलेले डॉ. पिसाळ यांनी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी न्यू पॅलेस येथे उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.

शिवजयंतीच्या पावन निमित्ताने झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. इतिहास, सामाजिक बांधिलकी आणि आधुनिक उद्योगविश्व यांचा संगम या प्रसंगी पाहायला मिळाला. डॉ. पिसाळ यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या विचारांना वंदन केले. त्याचबरोबर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली.

या कार्यक्रमाला साताऱ्याच्या उज्वलाराजे निंबाळकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच जय माळवी, विक्रांत अनिल सावडकर, विजयराज अनिल सावडकर, अनिल माळवी प्रतिष्ठानचे अनिल माळवी, उमेश नामदेव पाटील आणि श्री पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. रोहित पिसाळ यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, रमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ सुमारे ६८ कोटी रुपये किमतीची सोन्याची साडी लंडनमधील म्युझियमसाठी प्रदान करण्यात आली आहे. भारतीय इतिहास आणि सामाजिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयी जागतिक स्तरावर आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.donate 68 cr rs saree to ramabai Ambedkar statue At London musium 

शिवजयंतीच्या निमित्ताने झालेली ही भेट कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला आणि आधुनिक भारताच्या प्रगतीला जोडणारी ठरली. सामाजिक भान, सांस्कृतिक जतन आणि उद्योगक्षेत्रातील यश यांचा संगम या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

Post a Comment

0 Comments