कोल्हापूर : प्रतिनिधी
डी वाय पाटील अभियांत्रिकी विद्यापीठात गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मेडिकल कॉलेज स्टुडंट कौन्सिलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पालखी मिरवणूक, लेझीम आणि हलगीच्या तालावर जयघोष करत संपूर्ण परिसर शिवमय झाला.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. हलगी व लेझीमच्या तालावर “जय शिवराय” च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिवजयंती सोहळ्याला विशेष रंगत आली.
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा राजनंदिनी निंबाळकर (Medical College) यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकल, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी तसेच इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.Shiv Jayanti Celebration Kolhapurया प्रसंगी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते शिवजयंती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कुलगुरू डॉ. राकेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, डीन डॉ. राजेश ख्यालप्पा, फिजिओथेरपी प्राचार्य डॉ. अमृतकुंवर रायजदे, नर्सिंग प्राचार्य डॉ. उमराणी, फार्मसी प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे तसेच सहाय्यक कुलसचिव अजित पाटील उपस्थित होते.DY Patil Student Council Program
शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रावर आधारित नाटिका (Skits), पारंपरिक नृत्य, पोवाडा, गायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकूण १५ कार्यक्रम सादर करण्यात आले. पालखी सोहळा, हलगी व लेझीम नृत्यामुळे संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भारावून गेला.Shiv Jayanti Palakhi Procession

0 Comments