डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डी वाय पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून Social Service उपक्रम Food distribution occasion of Sanjay d patil birthday

कोल्हापूर : प्रतिनिधी

 डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवर्गाने एकत्र येत गरजू आणि विशेष मुलांसाठी खाऊ, ब्लँकेट व क्रीडा साहित्य वाटप केले.Social Initiative Kolhapur Dr Sanjay D Patil Birthday

स्वयं मतिमंद शाळा येथे विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वितरण करण्यात आले. तसेच शिये येथील आलाय संकुलातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक धैर्य व आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने संवाद व प्रोत्साहनपर उपक्रमही आयोजित करण्यात आले.Food Distribution Program

याशिवाय भवानी मंडप – महालक्ष्मी परिसरात थंडीमुळे उघड्यावर झोपणाऱ्या गरजूंना शंभरहून अधिक ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.या कार्यक्रमास कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू लटकर, गौरव राजू पसार, केमिकल विभाग प्रमुख के. टी. जाधव, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमर सिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राहुल महाजन, प्रा. पूनम मंडळे, प्रा. सुमित पोद्दार तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धार्थ वलशेट्टी, रुपेश निंबाळकर, किरण ढेरे, रोहन यादव, कुबेर हवालदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

0 Comments