कोल्हापूर आगारात ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 प्रवाशांच्या सेवेत अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी कोल्हापूर आगाराच्या ताफ्यात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल झाल्या आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या नव्या बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.एस.टी. महामंडळाकडून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विविध आगारांमध्ये नवीन बस दाखल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर आगाराला पाच नव्या बस मिळाल्या आहेत.

या बसमुळे कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. जुन्या बसवरील प्रवाशांचा ताण कमी होण्यासोबतच नियमित आणि वेळेवर बससेवा देण्यासाठीही या नव्या बस उपयुक्त ठरणार आहेत.


लोकार्पणावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसमधून प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.नव्या बसचा योग्य वापर करून प्रवाशांना सुरक्षित आणि समाधानकारक सेवा देण्याच्या सूचना त्यांनी एस.टी. अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी एस.टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, कार्यशाळा कर्मचारी, महिला कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर आगाराच्या सेवेत नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments