डी. वाय. पाटीलच्या ६८ विद्यार्थ्यांना नोकरी; ९ लाखांचे पॅकेज

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांनी नोकरीच्या निवड प्रक्रियेत मोठे यश मिळवले आहे. विभागातील ६८ विद्यार्थ्यांची २९ हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.


या निवड प्रक्रियेत मोव्हेट कंपनीमध्ये सना मुजावर हिला ९ लाख रुपये वार्षिक सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. यामुळे एआयएमएल विभागाच्या विद्यार्थ्यांच्या यशाची कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात चर्चा होत आहे.

लॉन्च्ड ग्लोबल कंपनीमध्ये सर्वाधिक १२ विद्यार्थ्यांची निवड झाली. एड्युव्हर्सिटी बंगळुरूने १०, अनलॉक्स अकॅडमीने ८, इन्फोसिसने ६, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने ४, तर फोक्सवॅगनने ३ विद्यार्थ्यांची निवड केली.

विद्यार्थ्यांना मोव्हेटमध्ये ९ लाख, एचपीमध्ये ८.५ लाख, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्समध्ये ७.२ लाख, लॉन्च्ड ग्लोबलमध्ये ७ लाख, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख आणि झंवर ग्रुपमध्ये ५.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र-अधिगम, संगणकीय सराव, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, सराव मुलाखती, गटचर्चा आणि करिअर मार्गदर्शनाचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःला तयार करण्यास मदत होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशनचे मानांकन प्राप्त असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त, कार्यकारी संचालक, प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासनाने निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments