D Y Patil Engineering College Kolhapur: CSE विद्यार्थ्यांना 185 हून अधिक Job Offers

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSE) विभागातील विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक Job Offers मिळाले आहेत.

यामध्ये Hewlett-Packard (HP) कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ८.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये Launched Global या कंपनीने सर्वाधिक ४३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यानंतर Unlocks Academy २०, Wallstar Technologies १९, Infosys १३, TestYantra Software Solutions १० आणि TCS ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

याशिवाय Eduversity Bengaluru, Cyber Success, ExcelR, Hexaware Technologies, Volkswagen India, Fox Solutions, Microlise आणि Pegasus यांसह विविध कंपन्यांनी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

पॅकेजच्या बाबतीतही विद्यार्थ्यांना चांगल्या ऑफर्स मिळाल्या आहेत. HP कडून ८.५ लाख रुपये, TCS आणि Launched Global कडून ७ लाख रुपये, Unlocks Academy कडून ६ लाख रुपये, Pegasus कडून ५.५ लाख रुपये, Fox Solutions कडून ५.४६ लाख रुपये आणि Hexaware कडून ४ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले आहे. Infosysकडून ३.६ लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तयार करण्यासाठी महाविद्यालयात Technical Training, Coding Practice, Communication Skills, Soft Skills, Mock Interviews, Group Discussions आणि Career Counselling यांसह Placementपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चांगल्या संधी मिळत आहेत.

दरम्यान, महाविद्यालयाला Washington Accordच्या निकषांनुसार National Board of Accreditation (NBA) मानांकन मिळाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला आहे. या मान्यतांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली आहे.

या यशासाठी अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, Training and Placement Officer प्रा. मकरंद काईंगडे, CSE विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल, Placement Coordinators तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, CHRO श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments