कोल्हापूर | प्रतिनिधी :
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी, देवस्थानच्या जमिनी आणि मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी कोल्हापुरात 'रामरक्षा महाआरती' आंदोलन करण्यात आले. राजारामपुरी येथील हनुमान मंदिरात झालेल्या या आंदोलनातून कथित घोटाळ्याची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी यावेळी महायुती सरकारवर टीका करत, "प्रभू श्रीरामाच्या नावावर मते मागणाऱ्यांनीच मंदिराच्या नावाखाली भ्रष्टाचार केला आहे. या कथित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून एसआयटी चौकशी करण्यात यावी," अशी मागणी केली.
या आंदोलनात शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. महाआरतीद्वारे भ्रष्टाचार उघडकीस यावा आणि जनतेला न्याय मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली.
मंदिर भूखंड घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मंजित माने, शहर प्रमुख विशाल देवकुळे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, तालुका प्रमुख राजू यादव, विनोद खोत, महिला शहर प्रमुख रीमा देशपांडे, नगरसेवक सुनिल मोदी, राजू सांगावकर, राजेंद्र जाधव, सुमित मेळवंकी, आदित्य हुलजी, दिनेश परमार, पल्लवी चिखलीकर, गिरीजा कवडे, जयश्री माडीमगिरी, स्मिता वांद्रे, रोहित वेढे, अरुण अब्दागिरी, अभिजित बुकशेट, धैर्यशील पाटील यांच्यासह शहर व परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments