Marathi Film Corporation Election 2026: समर्थ पॅनेलचा जाहीरनामा प्रसिद्ध; राज्यभरात 500 Mini Theatres उभारण्याचे आश्वासन

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 7 जून 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनेलने आपला बहुचर्चित जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित सभासद मेळाव्यात पॅनेलचे प्रमुख मेघराज राजेभोसले आणि सुशांत शेलार यांनी विविध महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली.


समर्थ पॅनेलच्या जाहीरनाम्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे राज्यभरातील एसटी बसस्थानक परिसरात 500 Mini Theatres उभारण्याचा प्रस्ताव. या प्रकल्पामुळे मराठी चित्रपटांना ग्रामीण आणि निमशहरी भागात मोठे प्रदर्शन व्यासपीठ उपलब्ध होईल, असा दावा पॅनेलकडून करण्यात आला आहे.

याशिवाय चित्रपट कामगारांच्या वेतनात किमान 25% Salary Increase, सर्व सभासदांसाठी Accident Insurance आणि Health Insurance, तसेच निर्मात्यांसाठी स्वतंत्र Film Distribution Network उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

गेल्या दहा वर्षांतील कामांचा आढावा घेताना मेघराज राजेभोसले यांनी सांगितले की, कोल्हापुरात आधुनिक चित्रनगरी उभारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. कोरोना काळात सभासदांना आर्थिक मदत मिळवून देण्यासह महामंडळाच्या आर्थिक ठेवी वाढविण्यात यश आले. तसेच सुमारे 8 कोटी रुपये किमतीच्या महामंडळाच्या इमारती उभारण्यात आल्या असून विविध भागांत शाखांचा विस्तार करण्यात आला आहे.

मेळाव्यात बोलताना संजय ठुबे आणि धनाजी यमकर यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. महामंडळावर कोणताही प्रशासक नेमलेला नसून विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी रवी गावडे यांनी विरोधी उमेदवार रणजीत जाधव यांच्यावर मयत सभासदाचे कार्ड वापरून कामगार गटातून निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच काही विरोधी नेते महामंडळाविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याची टीकाही समर्थ पॅनेलच्या उमेदवारांनी केली.

या पत्रकार परिषदेला शरद चव्हाण, राज काझी, दीपक कदम, प्रवीण पाटील, विकास तोरणे यांच्यासह अनेक सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments