आंबा घाटात भीषण अपघात | रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू | Kolhapur Ratnagiri Highway Accident

शाहूवाडी - प्रतिनिधी (  रोहित पास्ते ) 

कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून उपचारादरम्यान रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. सलग सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे आंबा घाट पुन्हा चर्चेत आला आहे.मृत चालकाचे नाव सुरेश शामराव साळुंखे, वय ६६, राहणार कोल्हापूर असे असून त्यांच्या ताब्यातील एमएच 09 ईएल 2608 क्रमांकाची रिक्षा अपघातग्रस्त झाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश साळुंखे हे आपल्या रिक्षामधून कोल्हापूरहून गणपतीपुळे येथे पेढ्यांचा माल Supply करण्यासाठी जात होते. शुक्रवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान त्यांची रिक्षा आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ आली असता अचानक रिक्षा पलटी झाली.प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हा Accident झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघात इतका भीषण होता की चालक सुरेश साळुंखे हे रिक्षाखाली अडकून पडले होते. रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पेढ्यांचे Boxes भरलेले होते.

घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी Ratnagiri येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी साखरपा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आंबा घाटात सातत्याने अपघात होत असल्याने वाहनचालकांनी Driving करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments