कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 पश्चिम महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीवन रक्षक सेवा संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ. अश्विनी भरत गोपुडगे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थापक अध्यक्ष शरद नारकर, तसेच जीवन रक्षक Rescue Force चे लीडर सुनील कांबळे व महिला कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सदर निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सौ. गोपुडगे या गेल्या अनेक वर्षांपासून social work मध्ये सक्रिय असून, त्यांनी emergency services, health awareness तसेच women empowerment या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर संस्थेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताना सौ. गोपुडगे यांनी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यावर भर देण्यात येईल. तसेच महिला सक्षमीकरण आणि आपत्कालीन सेवांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.”

दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.