शाहुवाडी : नवप्रवाह मराठी
अनुसूचित जातींच्या Subclassification Report विरोधात भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अहवालाची होळी करून शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी महासंघाने सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, हा निर्णय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. Divide and Rule policy राबवून अनुसूचित जातींमध्ये मतभेद निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
या निषेध आंदोलनात प्रदेश अध्यक्ष श्रीकांत कांबळे, दयानंद कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महासंघाने शासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की:
👉 हा अहवाल तात्काळ मागे घ्यावा
👉 अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल

0 Comments