कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूरच्या तरुणाईसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेंडा पार्क येथे आयटी पार्क (IT Park) उभारण्यासाठी 34.36 हेक्टर जमीन AIDC कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरमधील IT क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.या संदर्भात आमदार Amal Mahadik यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या तरुणाईच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. आयटी पार्कसाठी त्यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच आमदार अमल महाडिक यांनी आयटी पार्क प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, तत्कालीन उपमुख्यमंत्री Ajit Pawar, उद्योगमंत्री Uday Samant यांच्याकडे निवेदन देत प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली होती.तसेच महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कृषी विभागाकडील जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला होता.सध्या कोल्हापूरमधील अनेक आयटी इंजिनिअर्सना रोजगाराच्या संधींसाठी पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांकडे स्थलांतर करावे लागत होते. या ब्रेन ड्रेनला आळा घालण्यासाठी कोल्हापूरमध्ये आयटी पार्कची गरज असल्याचे आमदार महाडिक यांनी अधोरेखित केले होते.दरम्यान, मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार कृषी विभागाची 34.36 हेक्टर जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या आयटी पार्कमुळे कोल्हापूरमधील तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापूरकरांना दिलेल्या वचनाची पूर्तता होत असल्याचा आनंद असल्याची भावना आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

0 Comments