डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा ‘ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ प्रोजेक्ट ठरला अव्वल | Hack Fest 2026 Kolhapur

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या Hack Fest 2026 स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या School of Architecture विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. Architectural Design and Model Making या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या Energy Efficient Bus Stop या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत सहभागी संघांना दिलेल्या विषयावर आधारित प्रत्यक्ष कार्यरत मॉडेल सादर करण्याचे आव्हान होते. डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांनी ‘Smart Building Concept’ लक्षात घेऊन बस स्टॉपचे असे डिझाईन तयार केले, जे ऊर्जा बचत, पर्यावरणपूरकता आणि आधुनिक शहरी गरजा यांचा समतोल साधते. या प्रकल्पामध्ये नैसर्गिक वायुवीजन, सौरऊर्जेचा वापर आणि स्मार्ट लाइटिंग यांसारख्या संकल्पनांचा प्रभावी समावेश करण्यात आला होता.स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण आणि अभिनव कल्पनेमुळे या प्रकल्पाला रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघात स्वयंम सागर शितोळे, आस्तिक सिंग जाधोन, सुमित तुकाराम कदम आणि संकल्प राजेश खोत या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट संतोष आळवेकर, तन्वी शेटके, इंद्रजीत जाधव आणि तेजस पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रकल्प अधिक प्रभावी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम ठरला.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, तसेच विश्वस्त, प्राचार्य आणि विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हा ‘Energy Efficient Bus Stop’ प्रकल्प भविष्यातील स्मार्ट सिटी संकल्पनेला चालना देणारा असून, शहरी वाहतूक व्यवस्थेत ऊर्जा बचतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देत असून, देशातील आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्राला नवीन दिशा देत आहेत.

Post a Comment

0 Comments