बनावट HSRP नंबर प्लेट कारखान्यावर छापा; 4.06 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर | प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट तयार करून विक्री करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन मशिन्ससह विविध साहित्य असा एकूण ₹4,06,960 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष बबन यादव (वय 31 वर्षे), रा. साजणी, ता. हातकणंगले याला अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर कारवाई: 

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय व गुन्हेगारी कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदारांनी शहर व जिल्ह्यात गोपनीय माहिती संकलन सुरू केले होते. साजणी येथे श्री साई रेडीयम आर्टस दुकानावर छापा तपासादरम्यान पोलीस अंमलदार नवनाथ कदम यांना माहिती मिळाली की, संतोष बबन यादव (वय 31 वर्षे), रा. साजणी, ता. हातकणंगले हा आपल्या “श्री साई रेडीयम आर्टस” या दुकानात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बनावट HSRP नंबर प्लेट तयार करून ती खरी असल्याचे भासवून विक्री करत आहे. दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी साजणी गावातील दुकानावर छापा टाकून संतोष यादव यास ताब्यात घेतले. 

जप्त केलेला मुद्देमाल छाप्यात खालील साहित्य जप्त करण्यात आले: 

 1 प्लेट एम्बॉसिस मशीन 1 फाईल हिटर मशीन 33 तयार HSRP नंबर प्लेट 55 सॉकेट 55 पिवळ्या रंगाच्या पत्र्याच्या प्लेट 132 काळ्या रंगाच्या डाय 182 पांढऱ्या रंगाच्या डाय 402 स्टिकर ‘INDIA’ लिहिलेला प्लास्टिक पेपर रोल इतर साहित्य एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹4,06,960 प्रति प्लेट 500 रुपयांना विक्री तपासात निष्पन्न झाले की, संतोष यादव हा बनावट HSRP नंबर प्लेट तयार करून प्रत्येक प्लेट ₹500 प्रमाणे विक्री करत होता. त्याच्याकडे महाराष्ट्र मोटार वाहन विभाग (MMVD) किंवा शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. गुन्हा दाखल या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 46/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 318, 336(2), 336(4), 340(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास हातकणंगले पोलीस ठाणे करीत आहे. 

कारवाईत सहभागी अधिकारी :

ही कारवाई पोलीस अधीक्षक  योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक  बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक  आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी  अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, नवनाथ कदम, रामचंद्र कोळी, परशुराम गुजरे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे व अरुण धनगर यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments