भिमा कृषी व पशू प्रदर्शन 2026: आज उद्घाटन, चार दिवस मेरी वेदर मैदानावर भव्य सोहळा

कोल्हापूर ; प्रतिनिधी 

कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य १८ वे भिमा कृषी व पशू प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मेरी वेदर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ना. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत.


Bhima Krushi Exhibition 2026 Begins in Kolhapur खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कृषी कंपन्यांचा सहभाग असून २०० हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पशुपालन, मत्स्यपालन, एआय तंत्रज्ञान व शासनाच्या विविध योजनांची माहिती येथे मिळणार आहे.यंदाचे खास आकर्षण म्हणजे ५ फुटाचा इग्वाना, प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखांचा खिल्लार खोंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दूध देणारी एचएफ गाय तसेच विविध जातींची जनावरे व पक्षी.चार दिवस कृषी तज्ञांची मार्गदर्शन व्याख्याने, शेतीभूषणसह विविध पुरस्कार वितरण, तांदूळ महोत्सव आणि दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

18th Bhima Krushi & Pashu Exhibition begins in Kolhapur from Feb 13-16 at Merry Weather Ground with 200+ stalls, expert sessions and livestock attractions.

५ फुटाचा इग्वाना भिमा कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिमा कृषी व पशू प्रदर्शनात यंदा कोल्हापूरकरांना प्रथमच तब्बल ५ फुटाचा इग्वाना (सरडा) पाहायला मिळणार आहे. १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मेरी वेदर मैदान येथे आयोजित या प्रदर्शनात हा विदेशी सरडा मुख्य आकर्षण ठरणार आहे.विशेष म्हणजे इतक्या मोठ्या आकाराचा इग्वाना प्रत्यक्ष पाहण्याची संधी क्वचितच मिळते. त्याची लांब शेपटी, वेगळ्या रंगाची त्वचा आणि शांत स्वभाव यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा खास आकर्षणाचा विषय ठरणार आहे. प्रदर्शनात इग्वानाच्या आहार, संगोपन आणि वैशिष्ट्यांबाबतही माहिती दिली जाणार आहे.

कोल्हापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी या भव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments