कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुभाष नगर, शेंडा पार्क परिसरातील खाऊ गल्ली आणि भाजी मार्केटमध्ये वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांची भेट घेऊन परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चर्चा केली.
चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, तसेच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिसरात तातडीने Police Patrolling वाढविण्यात येईल, तसेच आवश्यक ठिकाणी CCTV Camera Installation बाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान सनी साळे, धनंजय थोरात, तुषार कामरा, वंश आगावणे, अतुल जोगदंडे आदी उपस्थित होते.

0 Comments