कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
उचगाव परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून आता वाद निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उचगाव येथील महावितरण (MSEB) कार्यालयात शाखा अभियंत्यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
उचगाव हे सुमारे 60 ते 70 हजार लोकवस्तीचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणावर कामगार आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे नागरिक राहतात. ग्रामपंचायतीलाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे चौगुले यांनी सांगितले.यावेळी स्मार्ट मीटर संदर्भातील अनेक प्रश्न शाखा अभियंत्यांसमोर मांडण्यात आले. नागरिकांना मीटरची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे का? अर्थिंग नसलेल्या घरांवर याचा काय परिणाम होईल? तसेच वीज वापराच्या पद्धतीत कोणते बदल होणार आहेत? अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
विक्रम चौगुले यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी नागरिकांमध्ये Transparency आणि Consumer Awareness निर्माण करणे आवश्यक आहे. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवावा, अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शाखा अभियंत्यांनी हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ पातळीवरील मार्गदर्शनानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विक्रम चौगुले यांच्यासह विराट करी, भाऊ चौगुले, महेश खांडेकर, अमोल पोवार, राम पाटील, गणेश मस्कर, गणेश गावडे, सचिन माने, अजित रोटे, सचिन गुरव, प्रमोद शिंदे, मुमताज धारवाडकर, अनिल माने, जीतू सुतार, आंबा जाधव, धनंजय पाटील, हौसेराव राजमाने, जगन्नाथ माने, सुनील पारपानी, दीपक फ्रेमवाला, विनोद रोहीडा, उत्तम आडसुळ, अनिल माळी, सुजल पवार, रंगराव पाटील, चेतन ननवरे, शिवम चौगुले, सुमित लांबोरे, अथर्व सूर्यवंशी, शिवाजी लोहार, बंडा यडुरकर, पाटील मामा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments