कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
आजच्या काळात Biotechnology चे महत्त्व प्रचंड वाढले आहे. Pharmaceuticals, Agriculture आणि Environment Protection यांसारख्या क्षेत्रांत या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होत आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी लक्षात घेऊन या क्षेत्रात केवळ पदवी न घेता Skill-based आणि Research-oriented दृष्टीकोन विकसित करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम संशोधक डॉ. एस. आर. यादव यांनी केले.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या (D.Y. Patil University) सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमधील Stem Cell & Regenerative Medicine आणि Medical Biotechnology विभागातर्फे आयोजित ‘BioSkill-2026’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा. डॉ. राकेशकुमार शर्मा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे (NCL) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद जी. दस्तगर, संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा. डॉ. राकेशकुमार शर्मा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे (NCL) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद जी. दस्तगर, संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती
डॉ. यादव पुढे म्हणाले की, Stem Cell आणि Regenerative Medicine मुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होत आहे. यामुळे भविष्यात अनेक असाध्य रोगांवर (Incurable Diseases) उपचार करणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांनी Lab skills, Data Analysis आणि Bioinformatics मध्ये स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
Bacterial Nanocellulose: भविष्यातील जैवसाहित्य
डॉ. सय्यद जी. दस्तगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, Bacterial Nanocellulose हे भविष्यातील अत्यंत उपयुक्त जैवसाहित्य (Biomaterial) ठरणार आहे. त्याच्या High water retention capacity मुळे Tissue Engineering आणि Packaging Industry मध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद :
या परिषदेत राज्यातील विविध १० महाविद्यालयांमधून 130 प्रतिनिधी (Delegates) सहभागी झाले होते. कुलगुरू डॉ. शर्मा यांनी Biotechnology मधील करिअरच्या संधी आणि रोजगारावर सविस्तर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, डॉ. रेश्मा पवार व त्यांच्या टीमने केले.

0 Comments