ए.आय. व बायोमेकॅनिक्सचा समन्वय आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचा – डॉ. सुदीप काळे

पुणे : नवप्रवाह मराठी 

 डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे आयोजित ‘फिजिओसेतू 2026’ या राष्ट्रीय परिषदेत Artificial Intelligence (AI) आणि Biomechanics यांचा समन्वय आरोग्यसेवेला अधिक accurate, efficient आणि patient-centric बनवू शकतो, असा विश्वास तेरणा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नवी मुंबईचे विभागप्रमुख डॉ. सुदीप काळे यांनी व्यक्त केला.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. काळे म्हणाले की, फिजिओथेरपिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील एक essential component बनला असून AI आधारित उपचारपद्धती (AI-based treatment) आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णसेवा अधिक प्रभावी होत आहे. समन्वयित आरोग्यसेवा (coordinated healthcare approach) रुग्णांच्या उपचारात standardization आणि quality improvement घडवून आणते.

‘Biomechanics आणि AI coordination : Human performance आणि healthcare मधील नवे क्षितिज’ या विषयावर परिषद पार पडली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू स्वप्नील पाटील, प्राचार्य डॉ. अमृतकुंवर एस. रायजादे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. रायजादे यांनी ही परिषद current knowledge आणि future technology यांना जोडणारा ‘सेतू’ असल्याचे नमूद केले. देशभरातील ५० हून अधिक संस्थांमधून ७५० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी स्वप्नील पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात फिजिओथेरपीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, performance enhancement, injury prevention आणि rehabilitation साठी फिजिओथेरपी अत्यावश्यक आहे.

परिषदेत AI-based physiotherapy, motion capture technology, sports injury management आणि advanced rehabilitation techniques यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली. सुमारे २५० संशोधन पेपर व पोस्टर सादरीकरणे तसेच १८ मॉडेल सादरीकरणे झाली.

तसेच फिजिओथेरपी विषयक दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘Young Achiever’, ‘Best Educator’, ‘Scientific Contribution’, ‘Excellence in Rehabilitation’ आणि ‘Lifetime Achievement’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments