“Research हीच Future ची Key” : D. Y. Patil College of Nursing मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

 आरोग्य विज्ञान क्षेत्र झपाट्याने बदलत असून, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी अधिकाधिक संशोधनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन Brigadier Dechen Choeden यांनी केले. D. Y. Patil College of Nursing तर्फे आयोजित ‘Blending Evidence: Advancing Health Sciences Through Mixed Methods Research’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

कोल्हापूरमधील Sayaji Hotel येथील मेघमल्हार सभागृहात ही परिषद उत्साहात पार पडली. यावेळी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ Dr. Vedprakash Mishra, तसेच D. Y. Patil Deemed to be University चे कुलगुरू Dr. Rakesh Kumar Sharma यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन म्हणाल्या, “बदलत्या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी नवनवीन संशोधन पद्धती स्वीकारणे काळाची गरज आहे. Mixed Methods Research मुळे रुग्णसेवा, शिक्षण आणि Clinical Decision Making अधिक प्रभावी आणि अचूक होते. नर्सिंग क्षेत्रातील संशोधन आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनवू शकते.”त्यांनी युवा संशोधकांना आंतरशाखीय संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार प्रकाशनांवर भर देण्याचे आवाहन केले. “विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी Research Culture जोपासली पाहिजे. समाजाच्या बदलत्या गरजांसाठी संशोधन हेच सर्वात प्रभावी उत्तर आहे,” असेही त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना Dr. Vedprakash Mishra म्हणाले, “संशोधन ही केवळ शैक्षणिक गरज नसून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधनाच्या माध्यमातून नवे मानदंड निर्माण होऊ शकतात. संशोधकांनी समाजाच्या गरजा आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे.”

तर Dr. Rakesh Kumar Sharma यांनी, “गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन संस्कृतीची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठ स्तरावर आंतरशाखीय संशोधनाला अधिक प्रोत्साहन देऊन जागतिक दर्जाचे निष्कर्ष निर्माण करण्यावर भर दिला जाईल,” असे स्पष्ट केले.

या परिषदेत Mixed Methods Research चे महत्त्व, भविष्यातील दिशा आणि आरोग्य सेवेत त्याचा उपयोग यावर सखोल विचारमंथन झाले. यावेळी Dr. S. J. Nalini, Dr. B. Nayak, Dr. Shalini Nayak, Dr. Asha Solomon, Dr. Vishnu Ranjith, Dr. Karpagam Sethu, Dr. Amol Dongre आणि Dr. Shyamala Ramasamy यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

परिषदेस Dr. Shirish Patil, Dr. V. V. Bhosale, Dr. Shimpa Sharma, Dr. Umarani J., प्रो. मनीषा बिजापूरकर, डॉ. सुनील आवटी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी Dr. Sanjay D. Patil, Satej D. Patil, Ruturaj Patil, Prithviraj Patil आणि Tejas Patil यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments