कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
महिला भाविक, पर्यटक आणि कोल्हापूरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी सुविधा आता शहरात उपलब्ध झाली आहे. खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक Woolloo Women Washroom चे लोकार्पण रविवारी मातृ दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडले. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी ही सुविधा महिलांसाठी “आधारवड” ठरणार असल्याचे सांगितले.
महापौर सौ. रुपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत आणि भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या महिला स्वच्छतागृहांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, उपमहापौर अक्षय जरग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आधुनिक Technology सह Smart Sanitation सुविधा :
महिलांसाठी उभारण्यात आलेली ही स्वच्छतागृहे वातानुकूलित असून आधुनिक Smart Sanitation Technology ने सुसज्ज आहेत. सुरक्षा, स्वच्छता आणि सुविधा यांचा विशेष विचार करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृहासोबत महिलांच्या गरजेच्या वस्तूंचे दुकानही सुरू करण्यात आले असून त्यातून बचत गटातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
२५ वर्षांची मागणी अखेर पूर्ण :
अंबाबाई मंदिर, ज्योतिबा आणि पन्हाळा पर्यटनासाठी दररोज हजारो महिला भाविक कोल्हापुरात येतात. मात्र सार्वजनिक महिला स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शहरावर वारंवार टीका होत होती. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न प्राधान्याने हाताळण्यात आला.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आणि अवघ्या दोन महिन्यांत खासबाग मैदान चौक व ताराबाई पार्क येथे ही सुविधा उभारण्यात आली.
“Swachh Bharat” प्रेरणेतून Woolloo संकल्पना
कार्यक्रमात बोलताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, Woolloo ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या Swachh Bharat Abhiyan मधून प्रेरित आहे. कोल्हापूर मॉडेल संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आभार मानले. खासदार धनंजय महाडिक यांनीदेखील महायुती सरकार नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महिला सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य :
या प्रकल्पामुळे महिला भाविक आणि पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूरच्या Smart City Vision मध्ये हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

0 Comments