पाचगाव (कोल्हापूर) – नवप्रवाह मराठी
विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यू’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या विकासासाठी पुढे येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते, असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच सौ. प्रियांका संग्राम पाटील यांनी केले.Priyanka Patil Sarpanch
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष NSS श्रमसंस्कार शिबीर १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे उत्साहात संपन्न झाले.Pachgaon NSS Camp, D Y Patil University Kolhapur समारोप प्रसंगी सरपंच पाटील बोलत होत्या.श्रमसंस्कारातून ग्रामविकासाला चालना
सरपंच प्रियांका पाटील म्हणाल्या की, शिक्षण केवळ वर्गातील चार भिंतींमध्ये मर्यादित नसून समाजातील अडचणी समजून त्यावर उपाय शोधणे हेच खरे शिक्षण आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान, ग्रामसंवाद, आणि जनजागृती कार्यक्रम राबवून श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाचगाव ग्रामस्थ आणि विद्यापीठातील विद्यार्थी खांद्याला खांदा लावून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाजसेवा हेच विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सांगितले की, विद्यापीठाचे विद्यार्थी समाजसेवेला आपले कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक सदैव तत्पर राहतील.मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी ग्रामीण भागात आरोग्य साक्षरता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे आरोग्य जनजागृती आणि स्वच्छता उपक्रम राबवून ‘आरोग्यसंपन्न गाव’ घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे ते म्हणाले.स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या Health Awareness Camp Kolhapur शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी
या विशेष शिबिरामध्ये श्रमसंस्कार, ग्रामविकास आणि सामाजिक बांधिलकी यांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, ग्रामसंवाद, पर्यावरण जनजागृती तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे कार्यक्रम यशस्वी केले.कार्यक्रमास उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, मुख्याध्यापक अशोक पाटील, मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, डॉ. अद्वैत राठोड, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments